TopicJurisprudence and Juristic Principles
288 hadiths
288 hadiths
हजरत लकीत बिन सबरा [अल्लाह प्रसन्न असो त्यांच्यावर] वर्णन करतात की: मी बनी अलमुन्तफीक च्या शिष्टमंडळा सोबत प्रेषितां कडे अल्लाह ची सलामती असो त्यांच्यवर हजर झालो, जेव्हा आम्ही प्रेषितांच्या सलामती असो त्यांच्यावर घरी पोहचलो, तेव्हा ते घरी नव्हते, परंतु आम्हाला ईमानधारकांच्या मातोश्री आईशा अल्लाह राजी असो त्यांच्याशी भेटल्या, त्यांनी आम्हा करता खजीरा[ एक पदार्थ जो मांस व पिठापासुन बनवितात] बनविला, एक थाली आणल्या गेली, ज्यामध्ये खजुरी होत्या,
नंतर प्रेषितांचे[सलामती असो त्यांच्यावर] आगमन झाले, त्यांनी फरमाविले:<<तुम्हाला काहितरी खायला दिलं? किंवा भोजन तय्यार करु?>>
आम्ही म्हणालो:होय, अल्लाह च्या प्रेषिता,
त्यादरम्यान जेव्हा आम्ही प्रेषितांसोबत [अल्लाहची सलामती असो त्यांच्यावर] बसलो होतो, तेवढ्यात त्यांचा चरवाहा संध्याकाळी बकऱ्या हाकत आला, त्याच्यासोबत एक बकरीचं पिल्लु होतं, जो म्याम्या करत होता,
प्रेषितांनी [ सलामती असो त्यांच्यावर] त्याला विचारले:<<हे चरवाहा,बकरीने काय दिले? >>
तो म्हणाला:एक पिल्लु
प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] त्याला सांगितले की:<<या बदल्यात एक मोठी बकरी कापा>>
मग प्रेषित [सलामती असो त्यांच्यावर] म्हणाले:<<तुम्ही कदापिही असं समजु नका कि, आम्ही हि बकरी फक्त तुमच्यासाठी जिब्हा केली खरी गोष्ट अशी आहे की आमच्या कडे १०० बकऱ्या आहेत, व आम्हाला नाही वाटत की ति संख्या १०० हुन अधिक व्हावी, त्यामुळे ज्यावेळी नवा पिल्लु जणते, आम्ही त्याबदल्यात एक मोठी बकरी जिब्हा करतो>>
मी प्रश्न केला:हे अल्लाह च्या प्रेषिता [सलामती असो त्यांच्यावर] माझी एक पत्नि आहे व ति फार चबरट आहे, तिच्याबाबत मी काय निर्णय घेऊ?
प्रेषितांनी [सलामती असो त्यांच्यावर] सांगितले की:<<तु तिला घटस्फोट दे>>
त्यावर मी म्हणालो:हे अल्लाह च्या प्रेषिता! तिच्या सोबत खुप काळ झाला,व तिच्या पासुन मुलंबाळं सुद्धा आहेत,
प्रेषित [सलामती असो त्यांच्यावर] म्हणाले:<<तिला समजावुन सांगा,जर तिच्या अंतरंगात भलाई असेल तर ती जरुर सुधारेल, व आपल्या पत्नि ला एखाद्या गुलामासारखे मारु नका>>
मी म्हणालो:हे अल्लाह च्या प्रेषिता! मला वुजु बाबत सांगा,
प्रेषित [सलामती असो त्यांच्यावर] म्हणाले:<<वुजु पद्धतशीर पणे करावा, बोटांच्या दरम्यान [खीलाल] ओलावा करावा, व नाक च्या आत चांगलं पाणी ओळावे,परंतु रोजा उपवास असल्यास थोडं जपुन पाणी वापरावे>>.رواه أبو داود والترمذي والنسائي وابن ماجه